सतीश काळसेकर |
मी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षाला होतो... एका
कामानिमित्त भूपेश गुप्ता भवनमध्ये गेलो होतो... ज्या व्यक्तीशी काम होतं.. ती
व्यक्ती तिथे भेटणार होती... मी व माझा मित्र आकाश लोणके असे आम्ही दोघेजण गेलो होतो...
भूपेश गुप्ता भवनच्या दुसऱ्या मजल्यावर गेलो.... उजव्या बाजूला एक केबिन दिसली...
आतील एकाने विचारले “कोण हवे आहेत ? काही काम
आहे का ?”
मी त्यांना सविस्तर सांगितले कि असे असे काम
आहे..यांना यांना भेटायचे आहेत...
“ठीक आहे.. बाजूला जी केबिन आहे तिथे बसलेत बघा
ते ज्यांना तुम्हाला भेटायचे आहे...” ते म्हणाले.
आम्ही दोघेही बाजूच्या केबिनच्या दिशेने गेलो. आत
केबिनमध्ये सफेद रंगाच्या कुर्ता-पायजमा परिधान केलेला अंगाने धडधाकट आणि आवाजात
कणखरपणा आणी स्पष्टपणा असलेला एक व्यक्ती.
“सर, आत येवू का ?” मी विचारले.
“अरे विचारताय काय ? तुमचीच केबिन आहे...
तुम्हा तरुणांनी इथे येणे म्हणजे माझे भाग्यच..” समोरून उत्तर आले.
मी व आकाश आत केबिन मध्ये गेलो....परवानगी
घेवून खुर्चीवर बसलो.... जे काम होते ते पूर्ण केले. विश्वास बसत नव्हतं कि एवढ्या
मोठ्या व्यक्तीसमोर आपण बसलो आहोत. आतापर्यंत साहित्यिक म्हणून परिचयाचे असलेले हे
व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर होते. अशा लोकांची भेट होणे म्हणजे माझे भाग्यच. समोर
बसलेले ते व्यक्ती म्हणजे सतीश काळसेकर.
जवळ-जवळ दीड ते दोन तास आम्ही चर्चा केली
असेल.. जेव्हा काळसेकर सरांना कळले कि मी व आकाश दोघेही पत्रकारितेचे विद्यार्थी
आहोत तेव्हा त्यांनी पत्रकारितेवर खूप चर्चा केली. पत्रकारितेतील विविध
व्यक्तिमत्वांची उदाहरणे दिली व पत्रकारिता कशी असावी याबद्दल सांगितले शिवाय खूप
काही.... थोड्या वेळाने समोर असलेल्या एका गृहस्थाला जवळ बोलावले व त्याच्या कानात
काहीतरी सांगितले. ते गृहस्थ बाहेर गेले व थोड्या वेळाने जयदेव डोळे लिखित “समाचार”
हे पुस्तक घेवून आले. काळसेकर सरांनी ते
पुस्तक आम्हा दोघांना भेट म्हणून दिले. “नामदेव व आकाश तुमच्या आयुष्यातील पुढील
वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.” असे पुस्तकाच्या पहिल्या पानावर त्यांनी लिहिले आणि
त्याखाली त्यांची स्वाक्षरी. क्या बात है !!! मनातल्या मनात म्हटले... आयुष्यात
अजून काय हवे आहे ?... एवढ्या मोठ्या व्यक्तीने
असे स्वतःहून पुस्तक भेट देणे व त्यावर त्यांची स्वाक्षरी. एवढेच नव्हे.. काळसेकर सरांनी आम्हा दोघांचाही पत्ता लिहून घेतला व
गेली दोन-अडीच वर्षे ते एक रुपयाही न घेता ते आजही आम्हाला न विसरता त्यांचे “आपले वाङमय वृत्त” हे मासिक
पोस्टाने पाठवतात....
खरच अशा लोकांकडून मिळणारी कौतुकाची थाप, त्यांच्याकडून मिळणारे
प्रोत्साहन आयुष्यात खरच खूप मोलाचे असते.....
- नामदेव अंजना काटकर
namdev.katkar@gmail.com
very nice
ReplyDelete