विरोधी
बाकांवर असतानाही सत्ताधारी आणि त्यातही देशाचे पंतप्रधानच शरद पवार यांच्यासमोर
लोटांगणं घालतात म्हणून अनेकांच्या जीवाची घालमेल सुरु होतीच. त्यात भरीस भर
साहेबांना 'पद्मविभूषण' मिळल्याने आधीच्या
घालमेलीचं अस्वस्थेत रुपांतर झालं. तेही विकृत अस्वस्थेत. आणि त्यातूनच हे फोटो
आणि विनोदी कॅप्शन सूचू लागलेत.
मुळात
या विषयावर लिहिण्याची इच्छा नव्हती. पवार साहेबांना 'पद्मविभूषण' जाहीर झाल्यानंतर
लिहायला हवं, असं
वाटलं होतं. पण नाही लिहिलं. अगदी शुभेच्छा देणारी पोस्टही नाही टाकली. म्हटलं
शुभेच्छा, अभिनंदन
वगैरे मनातून आहेतच. पण गेले काही दिवस व्हाॅट्सअॅप असो किंवा फेसबुक, सगळीकडे असे फोटो
फिरतायेत. म्हणून राहावलं नाही.
पवार
साहेबांना 'पद्मविभूषण' म्हणजे देश संकटाच्या
खाईत लोटला गेला, अशी
बोंबाबोंब सुरु झाली. काहीही ठोस काम नसताना त्या सैफ अली खानला 'पद्म' मिळालेला
पवारग्रस्तांना चालतो. पण ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनंतर पवारांचा 'पद्म'ने गौरव केला गेला, तर जळफळाट होतो. कमालै
!
१९६७
ला पवारसाहेब पहिल्यांदा आमदार झाले. आज २०१७ सुरुय. ५० वर्षांची यशस्वी राजकीय
कारकीर्द देशात मोजक्या नेत्यांची आहे. त्यात पवारसाहेब अव्वल स्थानी आहेत.
१९७५-७६-७७
चा काळ. मतांच्या जमवा-जमवीसाठी वाट्टेल ते करावं लागत होतं. कास्ट अन् रिलिजन
पाॅकेट्स निर्णायक ठरत होते. त्या काळात शरद पवारांनी मुस्लिम व्होट बँकेला
फाट्यावर मारत हमीद दलवाईंना आपल्या सरकारी निवासस्थानी उपाचारासाठी ठेवून घेतले.
राजकारणात उघडपणे इतकी बेधडक कृतीपूर्ण भूमिका नेमक्याच नेत्यांनी घेतलीय. त्यात
पवार साहेब आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा मुद्दाही असाच आहे.
५०
वर्षांची कारकीर्द आहे. अनेक निर्णय चुकले असतील. चूकले आहेतच, असे म्हणूया. पण नेमकं
तेच घेऊन बसून, बाकीच्या
सकारात्मक कार्याकडे का दुर्लक्ष केलं जातं? की हे दुर्लक्ष
जाणीवपूर्वक असतं?
पवारांना
'पद्मविभूषण' म्हटल्यावर तळपायाची आग
मस्तकात जाणा-यांनी एकदा 'पद्म' पुरस्कारांची यादी
तपासा, लक्षात
येईल कुणा-कुणावर खैरात केलीय ते. मग अटलजींच्या डाॅक्टरपासून ते सुषमा
स्वराजांच्या डाॅक्टरपर्यंत किंवा असे कैक. मग ५० वर्षे सार्वजनिक जीवनात
वावरणाऱ्या आणि तेही लोकांचा प्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीचा 'पद्म'ने गौरव झाला, तर चूक काय?
'पवार' हेच ज्यांचं दुखणं आहे, त्यांना 'पद्म' रोखता आला नाही म्हणून
आता अशी बदनामी सुरुय. अशी नाही तर तशी. पण बदनामी करायचीच. चालूद्या.
'लोक
माझा सांगाती' असं
म्हणणा-या नेत्याला मूठभर विकृत डोचक्यांची भीती नसते. तशी असती, तर ५० वर्षे सार्वजनिक
जीवनात काढता आली नसती. असो.
पवार
साहेब ५० वर्षे हुकुमशाहीने सत्तेत नव्हते. लोकशाही मार्गाने लोकांमधून निवडून जात
होते. ५० वर्षे सातत्याने निवडून येतात, याचा अर्थ खरे 'लोकप्रतिनिधी' आहेत. मग याच इतक्या
मोठ्या कारकीर्दीचा 'पद्म'ने गौरव चूक कसा? आणि 'पद्म'चा राग म्हणजे गेल्या
काही दिवसात सोशल मीडियातून फिरणारे हे फोटो. ते पाहून थोडं लिहावं वाटलं.
विरोधी बाकांवर असतानाही सत्ताधारी आणि त्यातही देशाचे पंतप्रधानच शरद पवार यांच्यासमोर लोटांगणं घालतात म्हणून अनेकांच्या जीवाची घालमेल सुरु होतीच. त्यात भरीस भर साहेबांना 'पद्मविभूषण' मिळल्याने आधीच्या घालमेलीचं अस्वस्थेत रुपांतर झालं. तेही विकृत अस्वस्थेत. आणि त्यातूनच हे फोटो आणि विनोदी कॅप्शन सूचू लागलेत.
मुळात या विषयावर लिहिण्याची इच्छा नव्हती. पवार साहेबांना 'पद्मविभूषण' जाहीर झाल्यानंतर लिहायला हवं, असं वाटलं होतं. पण नाही लिहिलं. अगदी शुभेच्छा देणारी पोस्टही नाही टाकली. म्हटलं शुभेच्छा, अभिनंदन वगैरे मनातून आहेतच. पण गेले काही दिवस व्हाॅट्सअॅप असो किंवा फेसबुक, सगळीकडे असे फोटो फिरतायेत. म्हणून राहावलं नाही.
पवार साहेबांना 'पद्मविभूषण' म्हणजे देश संकटाच्या खाईत लोटला गेला, अशी बोंबाबोंब सुरु झाली. काहीही ठोस काम नसताना त्या सैफ अली खानला 'पद्म' मिळालेला पवारग्रस्तांना चालतो. पण ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनंतर पवारांचा 'पद्म'ने गौरव केला गेला, तर जळफळाट होतो. कमालै !
१९६७ ला पवारसाहेब पहिल्यांदा आमदार झाले. आज २०१७ सुरुय. ५० वर्षांची यशस्वी राजकीय कारकीर्द देशात मोजक्या नेत्यांची आहे. त्यात पवारसाहेब अव्वल स्थानी आहेत.
१९७५-७६-७७ चा काळ. मतांच्या जमवा-जमवीसाठी वाट्टेल ते करावं लागत होतं. कास्ट अन् रिलिजन पाॅकेट्स निर्णायक ठरत होते. त्या काळात शरद पवारांनी मुस्लिम व्होट बँकेला फाट्यावर मारत हमीद दलवाईंना आपल्या सरकारी निवासस्थानी उपाचारासाठी ठेवून घेतले. राजकारणात उघडपणे इतकी बेधडक कृतीपूर्ण भूमिका नेमक्याच नेत्यांनी घेतलीय. त्यात पवार साहेब आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा मुद्दाही असाच आहे.
५० वर्षांची कारकीर्द आहे. अनेक निर्णय चुकले असतील. चूकले आहेतच, असे म्हणूया. पण नेमकं तेच घेऊन बसून, बाकीच्या सकारात्मक कार्याकडे का दुर्लक्ष केलं जातं? की हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक असतं?
पवारांना 'पद्मविभूषण' म्हटल्यावर तळपायाची आग मस्तकात जाणा-यांनी एकदा 'पद्म' पुरस्कारांची यादी तपासा, लक्षात येईल कुणा-कुणावर खैरात केलीय ते. मग अटलजींच्या डाॅक्टरपासून ते सुषमा स्वराजांच्या डाॅक्टरपर्यंत किंवा असे कैक. मग ५० वर्षे सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या आणि तेही लोकांचा प्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीचा 'पद्म'ने गौरव झाला, तर चूक काय?
'पवार' हेच ज्यांचं दुखणं आहे, त्यांना 'पद्म' रोखता आला नाही म्हणून आता अशी बदनामी सुरुय. अशी नाही तर तशी. पण बदनामी करायचीच. चालूद्या.
'लोक माझा सांगाती' असं म्हणणा-या नेत्याला मूठभर विकृत डोचक्यांची भीती नसते. तशी असती, तर ५० वर्षे सार्वजनिक जीवनात काढता आली नसती. असो.
पवार साहेब ५० वर्षे हुकुमशाहीने सत्तेत नव्हते. लोकशाही मार्गाने लोकांमधून निवडून जात होते. ५० वर्षे सातत्याने निवडून येतात, याचा अर्थ खरे 'लोकप्रतिनिधी' आहेत. मग याच इतक्या मोठ्या कारकीर्दीचा 'पद्म'ने गौरव चूक कसा? आणि 'पद्म'चा राग म्हणजे गेल्या काही दिवसात सोशल मीडियातून फिरणारे हे फोटो. ते पाहून थोडं लिहावं वाटलं.
No comments:
Post a Comment