प्रवीण बर्दापूरकर, माजी संपादक, लोकसत्ता (नागपूर आवृत्ती) |
माझ्याच लेखनाला मी कधीच नावं ठेवत नाही. कारण जे काही तोडकं-मोडकं लिहितो, ते माझं असतं. जसं जमतं, जे सूचतं, जे मत असतं, ते ते मांडत जातो. वैयक्तिकरित्या एक माणूस म्हणून आणि ज्या माणसांमधून आलो त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी व्यक्त होतो. किंबहुना, हा एक आणि एकमेव उद्देश माझ्या लेखनाचा आहे.
आतापर्यंत जवळपास 50 हून अधिक ब्लाॅग झाले
आहेत. अडीच-तीन वर्षांपूर्वी लिहिलेला पहिला ब्लाॅग आणि आजचा ब्लाॅग यामध्ये मला
स्वत:ला प्रचंड सुधारणा जाणवते. दरम्यानच्या काळात लेखनाचे वेगवेगळे प्रकार ट्राय केले.
सर्वच जमलंय अशातला भाग नाही. पुस्तक परीक्षण तर पार फसलं. कथालेखनही गंडलंय.
गावाकडील प्रसंग, स्वत:चे
अनुभव आणि विश्लेषणात्मक लेख, हे प्रकार त्यातल्या
त्यात बऱ्यापैकी जमतायेत. बस्स. बाकी बट्याबोळच.
कसंही लिहिलं, तरी फेसबुकवर कमेंट आणि
मेसेजमधून किंवा कधी प्रत्यक्षात कुणी भेटला, तर आवर्जून प्रतिक्रिया
मिळतात. मात्र, परवा
थोडं वेगळंच घडलं. पहिल्यांदाच.
आपलं लेखन अधिकाधिक
वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात असताना, ते लेखन अतिशय
महत्त्वाच्या व्यक्तीच्या नजरेखालून गेलं. ज्या व्यक्तीने लेखनशैलीवर हक्काने
बोलावं, अशा
व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी फोन आला. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांचा.
प्रवीण सरांचा स्वत:हून
फोन येणं, हीच
माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. 'डायरी' आणि 'डायरीनंतरच्या नोंदी' वगैरे तुम्ही वाचलं
असालच किंवा 'आई'सुद्धा. सर्वच बेस्ट.
पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही स्तरावर आदरणीय असलेल्या या व्यक्तीने स्वत:हून
मला फोन करणं, यापेक्षा
माझ्यासारख्या नवख्या पत्रकारासाठी आनंदाची बाब ती कोणती?
'नगरची निर्भया आणि
जातीचा चष्मा' हा
लेख वाचल्यानंतर प्रवीण सरांनी फोन करुन लेखनाचा फ्लो, शैली, विषय मांडणी यांवर
जवळपास 20 ते 25 मिनिटं चर्चा केली. मार्गदर्शन केलं. बरं तेव्हा वाटलं की, एका लेखापुरतं फोन केला
असेल. पण परवा पार्ट टाईम जॉबवरील लेखाबाबतही त्यांनी फोन करुन अत्यंत महत्त्वाचं
मार्गदर्शन केलं. शिवाय, याआधीच्या
ब्लॉगबद्दलही चर्चा केली.
प्रवीण सर वयाची साठी
पार आहेत. पत्रकारिता आणि इतर लेखनाचा त्यांना काही दशकांचा अनुभव आहे. त्यामुळे
माझ्यासारख्या नवख्या पत्रकारासाठी त्यांच्यासाठी बोलणं म्हणजे खूप काही
शिकण्यासारखंच आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेत, दोन्ही वेळेला फोनवरुन
त्यांना कित्येक प्रश्न विचारुन त्रास दिला. अर्थात यापुढेही देईनच.
पण भारी वाटलं. प्रवीण
बर्दापूरकर यांच्यासारख्या व्यक्तीने स्वत:हून आपल्याला फोन करुन लेखनशैलीबाबत
मार्गदर्शन करावं, आपलं
कौतुक करावं, ही
खूप मोठी गोष्ट आहे. किमान माझ्यासाठी तरी. ठेवणीतले सोन्याचे दागिने कसे असतात, ज्यांची आपण प्रचंड
काळजी घेतो. अगदी तसंच प्रवीण सरांची प्रतिक्रियाही माझ्यासाठी ठेवणीतलीच. अशा
प्रतिक्रिया जबाबदारीची जाणीव करुन देतात.
No comments:
Post a Comment