त्यांना तुमची सोबत नको असते.. त्यांना हवा असतो एकटेपणा....एकांतवास...
कधी कोणी रागावलं... एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करूनही पराभव
पत्करावा लागला..कि आपण निराशेच्या खाईत लोटले जातो. सारखं सारखं त्याचं गोष्टीचा विचार
करत बसतो. तेच तेच विचार पुन्हा पुन्हा आपल्या डोक्यात येत राहतात. आजूबाजूला
आपल्याला कुणीच नको असतं..अन्यथा त्याच्यावर आपला राग निघतो. जी लोकं खरच रागिट
असतात ते आपली निराशा कुठल्यातरी निर्जीव वस्तूची आपटाआपट करुन व्यक्त करतात. पण
त्यांची गोष्ट वेगळी असते जे आपली निराशा व्यक्त करण्यासाठी एकांतवासाचा पर्याय
निवडतात. मला त्या लोकांबद्दल नेहमी अप्रूप वाटत आलं आहे जी लोकं आपल्याला आलेली
निराशा काळ्याकूट्ट काळोखाशी व्यक्त करतात. तो काळोखही शांतपणे त्या व्यक्तीची
भूमिका ऐकून घेतो. एकांतवासाता व्यक्त होणाऱ्या व्याक्ती ह्या खूपच संवेदनशील
असतात... का बरं वाचत असावं त्यांना की आपलं ऐकणारं कोणाच नाही ? की त्यांना या जगात
कोणावर विश्वासच राहिलेला नसतो ? माहित नाही बुवा... पण एक नक्की की त्यांना त्या
एकांतातल्या काळोखावर त्या क्षणाला खूप विश्वास असतो. इतका की त्या एकांतात ते
तासनतास बसून राहतात.. काळोखाच्या सोबतीत त्याना बहुधा मन मोकळं होता येत
असावं..किंवा तो काळोखच त्यांना समजावत असावा..समजून घेत असावा.. असेल काही... अशा
संवेदनशील लोकांना एकांतवास हवा असतो तो आजूबाजूच्या निर्दयी माणसांपासून.. अशा
माणसांपासून जे त्या व्यक्तीला समजून घेत नाहीत..त्या व्यक्तीला व्यक्त होऊ देत
नाहीत... मग अशा परिस्थितीत त्या लोकांकडे त्यांचं ऐकून घेणारा एकच असतो तो
म्हणजे....एकांत..
- नामदेव अंजना काटकर
namdev.katkar@gmail.com
- नामदेव अंजना काटकर
namdev.katkar@gmail.com
No comments:
Post a Comment