प्रिय स्त्री हिस,
आज मला तुझीच तक्रार तुझ्याकडे करायची आहे.
मला तूझा राग आला आहे. मला पडलेल्या अनेक प्रश्नांची मी आज तूझ्याकडून उत्तरे घेणार
आहे नव्हे जाबच विचारणार आहे.
तसं म्हटलं तर तुझ्यावर होणारा अन्याय,
जुलूम हा शतकानुशतके होतो आहे. तुला सवयच झाली असेल अशा जूलुमांचा.. अन्यायांची
बहुतेक. मला एक नेहमी भिती वाटते की तूझी अशी मानसिकता तर नाही झाली ना की आपला
जन्म हा दुय्यमच आहे..आपण फक्त पुरुषाच्या गुलामीतच जगायचं. अशी मानसिकता जर झाली
असेल तर तुझं भवितव्य खूप कष्टदायक आणि हालाखीचे असेल म्हणून तूला हे अनावृत्त
पत्र लिहून सावधान करण्याचा प्रयत्न केला आहे.
एकीकडे तूझी पूजा होते, तूला मातेसमान मानलं
जातं तर त्याचवेळी तूझ्यावर मानवतेला काळीमा फासणारे पाशवी अत्याचार केले जातात
आणि हे अत्याचार दुसऱ्या-तिसऱ्या कोणाकडून नाही तर तूझ्याच लेकरांकडून, ज्यांनी
तूझ्याच गर्भातून जन्म घेतला, जे तूला मातेसमान मानतात. हे ही खरेच आहे की सर्वच
काही पुरुष तुझ्यावर अत्याचार करणारे नाहीत. अनेकजण तूझा आदर राखणारे आहेत पण तेही
या विकृत माणसांइतकेच दोषी आहेत कारण तेही याच समाजाचे घटक आहेत ज्या समाजातील
विकृत प्रवृत्ती तूझ्यावर अत्याचार करतात. तूझा मान-सन्मान राखणाऱ्यांना असे वाटत
असावे की ते निर्दोष आहेत कारण ते तूझ्या अत्याचारात सहभागी नाहीत. पण खरंतर तेही
तितकेच जबाबदार आहेत तूझ्यावरच्या अत्याचाराला कारण तूझा आदर राखणाऱ्यांना तूझ्यावर
होणाऱ्या अत्याचाराला रोखलं नाही. विकृत प्रवृत्तींचा विरोध केला नाही.
तू एक पिढी जन्माला घालतेस. कित्येकांना
अस्तित्व देतेस. स्वत:ला दुय्यम ठरवून इतरांचा विचार करत राहतेस. एक
पूर्ण कुटूंब सांभाळणं सोप्प नसतंच मुळी. तरीही तू न डगमगता, न घाबरता सांभाळतेस. कधी नवऱ्याकडून
होणारा त्रास तर कधी मुलाकडून होणारा त्रास. त्यातही जर तू एकटी असलीस अगदी स्पष्ट
बोलायचं तर तू विधवा असलीस तर मग समाजाच्या जाचाला तोंड देत तू निर्भयपणे जगतेस.
किती भयानक आयुष्य जगतेस तू. तरीही जे तुला त्रास देतात त्यांच्याच भल्यासाठी तू
जगतेस. किती किती प्रेम आहे तूझ्यात आणि सहनशक्तीही. पण मला तूझ्या या सहनशक्तीचा राग येतो. का
सोसावस तू हे सारं. तू का तूझं स्वातंत्र्या उपभोगण्याचा प्रयत्न करत नाहीस.
बस्स झालं आता. आता तू तूझ्या आयुष्याची
तडजोड करण्याचं सोडून दे. किती दिवस उंबरठ्याच्या आत कोंडून राहणार आहेस ? ही घुसमट सहनच कशी
करतेस तू ? आता या बंधनाच्या बेड्या तोडून मोकळ्या जगाचा निश्वास घे. तुझ्यासाठी
मोकळं असलेलं हे आकाश तुझ्या पंखांनी भरारी घे आणि व्यापून टाक. कारण तूझ्याही
पंखात भरारी घेण्याचं बळ आहे. तूझा वस्तू म्हणून वापर करणाऱ्यांना दाखवून दे की,
तू ही या जगात कमी
नाहीस...
तू ही या जगात कमी
नाहीस...
तुझ्या स्त्रीत्वाचा
आदर असणारा,
एक पुरुष
aata strila bharai ghenyachi vel aali aahe aani samajatil changlya lokani tila patimbha dyaychi
ReplyDelete