'आदिवासी: विकास की विस्थापन' हे मिलिंद बोकीलांचे पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचले.... या पुस्तकात 'आदिवासी म्हणजे आद्य निवासी' अशी आदिवासींची व्याख्या आहे....आद्य म्हणजे मूळचे, स्थानिक...
माझ्या माहितीप्रमाणे देशातील जिथे जिथे आदिवासी भाग आहेत तिथे तिथे मूलभूत सुविधांचीही वणवण आहे... अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधाही त्यांना मिळत नाहीत... संगणक आणि तुमचं इंटरनेट तर त्यांच्या गावीही नाही... अर्थात काही आदिवासी पाड्यांपर्यंत या सुविधाही पोहोचल्याही असतील मात्र त्या 'काही' आदिवासी पाड्यांपर्यंतच.... याचा अर्थ आपण त्यांचा हक्क हि्रावून घेतो आहे... इथल्या स्थानिकांनाच त्यांचे हक्क मिळत नाहीत.... आदिवासींपर्यंत आपली सरकारी यंत्रणा कधी पोहोचणार आहे कुणास ठाऊक....
विशेषत: रायगड जिल्ह्यात आदिवासींची संख्य़ा मोठ्या प्रमाणावर आहे... माझ्या गावच्या आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील अनेक तरुण शिक्षण अर्धवट सोडून देतात...
दहावीनंतर लगेच मुलींचं लग्न होतं...बालवयातच लग्न...त्यामुळे पुढील आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतं... का आपलं या आदिवासी बांधवांकडे दुर्लक्ष होतंय....?
पनवेलच्या तारा, रसायनी, आपटे या परिसरात काही आदिवासे पाडे आहेत..तिथे मी स्वत: फिरलो आहे... तिथली परिस्थिती तर अधिक भयानक आहे... विटभट्टीवर काम करण्याच्या नावाने त्यांच्यावर खूप अत्याचार होतात... विटभट्टी मालक काम न केल्यास मारहाणही करतात... असेही काही अनुभव इथल्या आदिवासींनी सांगितले...
एका विषयावर अभ्यास करण्यासाठी मागे एकदा पालघर परिसरातील आदिवासी पाड्यांना भेट देण्याची संधी मिळाली त्यावेळी तर असे लक्षात आले की साला हे आपण ज्या विकासाच्या गोष्टी करतो त्या किती पोकळ आहेत....खिशातल्या मोबाईलवर फोन आला म्हणून बोलायला बाहेर काढला तर चार-पाच मुले गोळा झाली.. मोबाईल बघायला.... आता सांगा तुमचा विकास कुठं पोहोचलाय ते....
आज महाराष्ट्र टाईम्समध्ये 'आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध' या पुस्तकातील प्रस्तावना प्रकाशित केली आहे... हा लेख वाचताना हे सारे आठवलं....
आदिवासी पाड्यांपासून विकास आजून कोसो दूर आहे हे नक्की..... माहित नाही सरकारी यंत्रणा तिथपर्यंत कधी पोहोचेल की नाही ते... पण आपण एक नागरिक म्हणून तरी पोहोचणार आहोत का नाही...?.... अर्थात काही संस्था आदिवासींसाठी खूप काम करत आहेत आणि त्यांना तर सलाम कारण आदिवासींचा विश्वास संपादन करुन त्यांच्यात राहून त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणे हे तितके सोपे नाही याची मला जाणीव आहे....

No comments:
Post a Comment