मुळात भारत आणि पाकिस्तानात अशी काही डोचकी
आहेत,
ज्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सौहार्दाचे संबंध
निर्माण व्हावे, असे वाटत नाही. त्यामुळेच या शक्ती
भारत-पाकिस्तान चर्चा होण्याच्या मार्गावर असली, की त्यात
खोडा घालतात. पठाणकोट हल्ला हा त्याच शक्तींनी केला आहे, हे
स्पष्ट आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. त्यामुळे भारत-पाकिस्तान
या दोन देशांमध्ये चर्चा होऊ शकते, अशी आशा
निर्माण झाली. दोन्ही देशांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. मात्र,
दहशतवादी शक्तींना हे पाहावत नसल्याने त्यातून पठाणकोट हल्ला
करण्यात आला. मुळात हे नेहमीचंच झालं आहे. भारत-पाकिस्तान चर्चा होणाच्या मार्गावर
असली की, नेमकं देश विघातक शक्ती सक्रीय होतात.
आता खरंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा रद्द न
करता,
उलट चर्चा करुन दहशतवाद्यांना उत्तर द्यायला हवं. खरंतर भारतानेच
नव्हे, पाकिस्ताननेही चर्चेसाठी पुढाकार घ्यायला हवा.
जोपर्यंत दोन्ही देशांमध्ये दहशतवाद किंवा इतर वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा होत
नाही, तोपर्यंत भारत-पाक संबंध कायम ताणलेलेच राहतील.
त्यातल्या त्यात एक आनंदाची बाब अशी आहे की, पठाणकोट हल्ल्यानंतरही पंतप्रधान मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ
यांनी फोनवरुन काही मिनिटं चर्चा केली. आशा आहे की, आगामी
काळात भारत-पाक चर्चा रद्द न होता, यशस्वी होईल. कारण
पाकिस्तानशी चर्चा रद्द करुन आपल्याला काहीच मिळणार नाहीय. उलट असेच हल्ले
यापुढेही दहशतवाद्यांकडून होत राहतील. त्यामुळे चर्चेला पर्याय नाही, हे दोन्ही देशांच्या नेतृत्त्वांना पटावं, हीच
इच्छा.
वर्तमान स्थितीत युद्ध पाकिस्तानला झेपणारं
नाही आणि भारताला युद्ध परवडणारं नाही. किंबहुना, संघर्षात
कायम ज्याच्याकडे असतं, त्याला गमवावं लागतं. त्यामुळे
युद्धात भारताचंच मोठं नुकसान होईल. त्यामुळे पाकिस्तानशी युद्ध करा, असे मत मांडणाऱ्यांनी आपापली तोंडं बंद ठेवावी. युद्ध वगैरे पुन्हा
एकोणीसाव्या-आठराव्या शतकात घेऊन जातील.
पुन्हा तोच मुद्दा- भारत असो वा पाकिस्तान, चर्चेशिवाय या दोन्ही देशांना पर्याय नाही. गेल्या 13-14 वर्षात भारताचे पंतप्रधान साधं पाकिस्तानतही गेले नाहीत. त्यामुळे
मोदींच्या छोट्याशा पाकिस्तान दौऱ्यामुळे नक्कीच आशा बाळगायला हरकत नाही. जोपर्यंत
चर्चेची दारं उघडत नाहीत, तोपर्यंत हे संबंध असेच राहतील.
त्यामुळे पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी चर्चा न थांबवता, ती केली पाहिजे. भले या हल्ल्याचा त्या चर्चेत जाब विचारा, पण चर्चा झाली पाहिजे. कारण चर्चा रद्द करुन आपल्या हाती काहीच नसेल. केवळ
पुढे काय होतंय याची वाट पाहावी लागेल.
मोदी-शरीफ भेटीनं एक आशादायी चित्र निर्माण
केलं आहे. त्या आशादायी चित्रावर रेघोट्या ओढणारे खूप आहेत. किंबहुना
त्यांनीचपठाणकोट हल्ला केलाच आहे. मात्र, मोदींनी हे
ओळखून चर्चा करावी एवढंच.
No comments:
Post a Comment