मध्यंतरी प्रचंड प्रदुषित असलेल्या पाताळगंगा नदीवर
अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. काही कारणास्तव हा अभ्यास मी पूर्ण करु शकलो
नाही मात्र जेवढा अभ्यास केला ते मांडण्याचा प्रयत्न करतोय.... अर्थात या
अभ्यासासाठी सर्वात जास्त मदत लाभली ती युसुफ मेहेर अली सेंटरची... मदन मराठे
सरांना सेंटरच्या गाडीतून एमआयडीसी परिसर, पाताळगंगा नदी अशा अनेक ठिकाणी भेटी
घालून दिल्या. मदन मराठे सर स्वत: 1989 च्या आंदोलनात
सक्रि. सहभागी होते त्यामुळे त्यांना पाताळगंगा नदीच्या प्रदुषणाची खडानखडा माहिती
आहे. नदी प्रदुषण होताना समोर दिसतंय शिवाय त्यावर जालिम उपाय असतानाही याकडे दुर्लक्ष
केले जात आहे. मदन मराठे सरांसोबतचा अनुभव ग्रेट होता...त्यांच्यासोबत आजूबाजूच्या
परिसरातील आदिवासी पाड्यांनाही भेटी देता आल्या... इमेल आयडी चेक करत असताना हा
रिपोर्ट हाती लागला. पातळगंगा नदी प्रदुषणावर काम करत असलेल्यांना कदाचित यातून
काही लिंक मिळू शकेल...त्यासाठी मी थोडक्यात तयार केलेला रिपोर्ट इथे देत आहे...
एकीकडे पाण्याचा प्रश्न दरवर्षी पाचवीला पुजलेला
असतानाच त्याचवेळी दुसरीकडे नदी प्रदुषणामुळे नदीच्या नदी वाया जाण्याचे भयानक
चित्र आपल्याकडे आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी उगम पावणारी पातळलगंगा नदी ही जणू एक
प्रकारची गटारगंगाच झाली आहे. खोपोली ते धरमतर खाडी असा जवळ-जवळ ६० किलोमीटरचा
प्रवास हा नदी करते. औद्योगिक कारखाने येण्याच्या आधी या नदीवर सुमारे ४० ते ४५
गावांच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून होता. मात्र औद्योगिक कारखान्यांच्या आगमनानंतर
पाताळगंगा नदी प्रदुषित व्हायला सुरुवात झाली. कारखान्यांतून निघणारे विषारी
सांडपाणी नदीत सोडले जाते त्यामुळे नदीतील माश्यांचा व इतर जीवांचे अस्तित्वच
धोक्यात आले अन् पिण्याच्या पाण्यासाठी पाताळगंगा नदीवर अवलंबून असलेल्यांची माणसांचेही.
१९८९ च्या आंदोलनानंतर या काही कारखान्यांनी संयुक्तरपणे Common Effluent Treatment Plant (CETP) बसविले व काही मोजक्या
कारखान्यांनी अंकर्गत स्वत:चे CETP बसविले. मात्र हे प्लॅंटसुद्धा किती प्रमाणात कारखान्यातून
निघणारा सांडपाणी शुद्ध करतात याबद्दल शंकाच आहे कारण पाताळगंगा एमआयडीसीनजीकच्या
सजग नागरिकांचे असे म्हणने आहे की माहारष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निरीक्षणासाठी
आल्यावर फक्त हे प्लॅंट चालू केले जातात. तर काही कारखान्याचे स्वत:चे असे अंतर्गत ETP आहेत
पण प्रश्न असा आहे की हे ETP प्लॅंट इतके महाग आहेत
की एखाद्या कारखान्याला वैयक्तिकरित्या बसविणे खूप खर्चिक होऊन बसतं. असे असताना
जर काही कारखान्यांचे अंतर्गत प्लॅंट असतील तर ते प्लॅंट केवढ्या प्रमाणात
कार्यन्वित असतील याचा शंका येते. शिवाय CETP
मधून प्रक्रिया करुन जे शुद्ध (?) पाणी पाताळगंगेत सोडले
जाते ते पाणी जर धरमतर खाडीतच प्रत्यक्षपणे सोडले गेले असते तर पाताळगंगा प्रदुषित
होण्याचे कारणच नाही मात्र हे शुद्ध (?) केलेले सांडपाणी असलेले
पाईप धरमतर खाडीच्या आधी म्हणजे जवळ-जवळ १३ कि.मी. दूर पाताळगंगेत सोडले आहे. जर
हेच पाईप धरमतर खाडीपर्यंत सोडले गेले तर पाणी पाताळगंगा एमआयडीसीमुळे होणार्या
जलप्रदुषणाला लगाम लागू शकतो मात्र एवढी मोठी पाईपलाईन टाकणे खर्चिक असल्याने ती
टाकली जात नाही. त्यामुळे हे रसायनयुक्त पाणी पुढील १३ कि.मी. पाण्याचे प्रदुषण
करते. एवढच नव्हे तर हे सांडपाणी पाताळगंगेत सोडण्यासाठी आणले जाते त्या पाईपचेही
रसायनयुक्त पाण्याच्या प्रवाहामुळे गळती होते. मग याचा परिणाम स्थानिकांना सहन
करावा लागतो. त्याचबरोबर न सहन होणारी दुर्गंधी तर आहेच.
पाताळगंगा एमआयडीसीमधील CETP च्या एका कर्मचार्याशी चर्चा केल्यावर असे लक्षात आले की पाताळगंगा एमआयडीसीमध्ये CETP असल्याने पाताळगंगा नदीत सोडण्यात येणारा पाणी हे शुद्ध
असते. त्यामुळे पाताळगंगा नदी प्रदुषणाचे मूळ खोपोलीत आहे कारण तिथूनच
कारखान्यातून निघणारा सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता पाताळगंगेत सोडला जातो व
जे मोठे रासायनिक कारखाने आहेत ते खोपोलीत आहेत त्यामुळे खरा प्रदुषण खोपोलीत
होतो.
स्थनिक रहिवाश्यांना सरकारने पिण्याच्या पाण्याची
सोय करुन दिली हे म्हणून स्थानिकही कोणत्याच प्रकारचा आवाज उठवत नाहीत. शिवाय
स्थानिकांना काही प्रमाणात एमआयडीसीमध्ये कामही मिळाले आहे. १९८९ साली खूप मोठ्या
प्रमाणावर लोकं रस्त्यावर उतरली होती याचे कारण तेव्हा पाताळगंगेच्या आजूबाजूचे
रहिवाशी हे पाताळगंगेच्या पाणयावरच अवलंबून होती मात्र ता पिण्याच्या पाम्याची सोय
जाली आहे. मात्र कित्येक गावंच्या व्यावसायावर गदा आली. पाताळगंगेतील माश्यांचे
अस्तित्व या रसायनयुक्त पाण्याने संपले व पाताळगंगेला पावसाळ्यात पूर आल्यावर पाणी
आजूबाजूच्या परिसरात घुसतो त्यामुळे रसायनयुक्त पाण्याने जमीनीही नापिक झाल्या
आहेत. एकीकडे पाण्यासाठी वणवण आणि दुसरीकडे पाण्याबाबत असलेला हलगर्जीपणा. खरंच
यावर गांभीर्याने विचार करायला हवं आहे.
-
नामदेव अंजना